(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - फुले सामाजिक व सांस्कृतिक शिक्षण मंडळ सिंदेवाही द्वारा संचालित महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाही येथे संस्थेचे संस्थापक मा.नरेंद्रजी ढोले यांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणवंत सोहळा नुकताच पार पडला.
Merit ceremony at Mahatma Phule Vidyalaya, Sindewahi
अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक पारिजात ढोले,प्रमुख पाहुणे संस्थेचे संचालक सारस्वत ढोले, विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर उईके ,सेवानिवृत्त शिक्षक युवराज बोरकर, नगरसेविका श्वेता मोहुर्ले,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अनिल तोरणकर हे होते. शेक्षणिक,सांस्कृतिक,क्रीडा , व इतर श्रेत्रात उल्लेखनीय प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रशस्ती पत्रक, नरेंद्र ढोले गुणवंत पुरस्कार ट्रॉफी देवून गुणगौरव करण्यात आला.त्यानंतर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला .कार्यक्रमाचे अध्यक्ष,तसेच प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर उईके यांनी केले तर सूत्रसंचालन रमेश बोरकर व आभार प्रदर्शन वर्षा घुगस्कर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment