सादिक थैम वरोरा:ईद मिलाद-उन-नबी निमित्त १६ सप्टेंबर रोज सोमवारला सकाळी शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. आंबेडकर चौकातील हजरत जहुरुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर मुस्लीम समाजाचे लोक एकत्रित झाले, तेथून मिरवणुकीला सुरुवात झाली. सद्भावना चौक, कासम पंजा, वीर सावरकर चौक, डोंगरवार चौक, मित्र चौक, आझाद वार्ड, काॅलरी वॉर्ड , नेहरू चौक यामार्गे हजरत जहुरुद्दीन चिश्ती यांच्या दर्गा येथे येऊन समाप्त झाली.
लहान मुले झेंडे घेऊन मिरवणुकीत चालत होती. सर्व मशिदींचे इमाम (मौलाना) हार घालून मिरवणूक पुढे चालत होते. त्यांच्या मागे मिरवणूक निघाली होती. यावेळी माजी नगराध्यक्ष अहेतशाम अली यांच्या तर्फे दर्ग्यावर महाप्रसाद ठेवण्यात आला. तर वीर सावरकर चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे मिरवणूकीचे स्वागत केले.
मार्गात मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांना पाणी आणि खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. या मिरवणुकीत लहान मुले, तरुण, वयोवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या काळात सर्व प्रमुख चौकावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम, वरोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी अजिंक्य तांबडे, उप पोलीस निरीक्षक विनोद जांभळे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
0 comments:
Post a Comment