ब्रम्हपुरी :-हिंदू समाजाचे आराध्य दैवत प्रभू राम यांचेवर गलिच्छ आणि खालच्या पातळीवर टीका करणारे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार ,शरद पवार, व ज्ञानेश महाराव यांचा शिवाजी चौक ब्रम्हपुरी येथे हिंदू संघटनाचे वतीने जाहीर निषेध करण्यात आला. आंदोलनात वडेट्टीवार यांच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध करण्यात आला .
Opposition leader MLA Vijay Wadettiwar's public protest
कारण ब्रम्हपुरी येथील सार्वजनिक गणेश मंडळात अयोध्या राम मंदिर देखावा निर्माण केला व त्यात श्रीरामाची भव्य मूर्तीची स्थापना केली कारण हिंदूची मते घ्यायची आहेत पण प्रत्येक्षात मात्र ते आपल्या वक्तव्यातून प्रभू राम यांची निंदा करतात .म्हणून प्रत्येक्षात प्रभू रामचंद्र यांच्या विरुद्ध बेताल वक्तव्य करणाऱ्या विजय वड्डेट्टीवार यांचा जाहीर निषेध करताना भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव प्रा प्रकाश बगमारे,विश्व हिंदू परिषद चे राजेंद्र ठाकरे,आल्हाद शिनखेडे, न प माजी गटनेते मनोज वठे यांचे सह विविध संघटना व भाजपचे कार्यकर्ते शहर अध्यक्ष अरविंद नंदुरकर,माजी प स सभापती प्रा रामलाल दोनाडकर,भाजयुमो जिल्हा महामंत्री तनय देशकर,भाजयुमो शहर अध्यक्ष प्रा सुयोग बाळबुद्धे,ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री मनोज भूपाल,ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष प्रा अशोक सालोडकर,महामंत्री प्रा दिलीप जुमडे,राजू भागवत ,विक्रम कावळे,देवराव नवघरे,अमित रोकडे,दत्ता येरावार ,प्रा सतीश शिनखेडे,स्वप्नील अलगदेवे,अविनाश मस्के त अध्यक्ष भाजयुमो ,रश्मी पेशने,बाबासाहेब कहारे व असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन चे ठाणेदार बानबले यांना निवेदन देऊन महाराव,शरद पवार, व विजय वडेट्टीवार यांचेवर गुन्हा नोंदविण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले
0 comments:
Post a Comment