चंद्रपुर :-चंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत चांदसुर्ली उच्च प्राथमिक शाळा येथे 5 सप्टेंबर 2024 ला शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
Chandsurli School celebrates Teacher's Day
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती तसेच मिनाक्षी अशोक गुरूवाले फाऊंडेशन तर्फे दिवंगत मिनाक्षी गुरूवाले सेवानिवृत्त शिक्षिका यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणयात आला तसेच गोड जेवन देण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री. मा. भारत उद्धव खैरकार (मुख्याध्यापक) प्रमुख पाहुने म्हणुन लाभलेले तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. मा. अरुणभाऊ दैवळकर विशेष अतीथी श्री. मा. अश्वयामा तावाडे निवृत्त रेंजर तसेच सुरेंद्र केमेकर होते.
प्रथम पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करुन फोटोना पुष्प हार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सुरेंद्र शेंडे सहा. शिक्षक यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजक अशोक गुरूवाले व विवेक गुरुवाले तसेच सौ. राजश्री कोसुरकर यांनी विद्यार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप केले. तसेच विद्यार्थ्यांना गोड जेवन दिले. शिष्यवृत्ती परीक्षेत पास कुमारी शितल कन्नाके एन.एम.एम.एस. परीक्षेत पास कु. तनुजा प्रमोद आत्राम, चित्रकला स्पर्धेत प्रथम कु. शुमदा गजभे, यांना विशेष प्रोत्साहनपर बक्षीस देवुन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात अशोक गुरूवाले यांनी जि.प. उच्च प्राथमिक शाळेची शैक्षणिक पात्रता सुधारणेकरीता गावातुन व गणपती व देवी मंडळाकडून विशेष मदत घ्यावे असं आव्हान केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. गिता पिदुरकर सहा. शिक्षिका यांनी केले.
0 comments:
Post a Comment