चंद्रपुर :चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या बिनबा गेट परिसरात एका व्यक्तीच्या घरी शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात सहा तासांनी यश आले आहे.चंद्रपूर शहरातील बिनबा गेट परिसरात बिबट शिरल्याची घटना समोर आली आहे. याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवत, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी वेळोवेळी योग्य सूचना दिल्या. जवळपास पाच तास आमदार जोरगेवार घटनास्थळी उपस्थित होते.
यावेळी रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करणाऱ्या पथकाचा त्यांनी सत्कार केला.
Leopard jailed after six hours of effort
पहाटे पाच वाजताच्या सुमारास बिनबा गेट परिसरातील झाडी-झुडपांमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. त्यांनी तत्काळ वनविभागाला याची माहिती दिली. माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिस विभागातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सोबतच, आमदार किशोर जोरगेवार यांनाही या घटनेची माहिती मिळताच ते मुंबईहून थेट घटनास्थळी पोहोचले. बिबट्याला पकडण्यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून ऑपरेशन सुरू करण्यात आले होते.
आमदार किशोर जोरगेवार सुद्धा जवळपास पाच तास घटनास्थळी ठाण मांडून होते. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. इमारतींवर चढून लोकांनी बिबट्याला पाहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे आमदार किशोर जोरगेवार लक्ष ठेवून होते. वेळोवेळी ते जमावाला संबोधित करत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत होते.
यावेळी आमदार जोरगेवारांनी दूरध्वनीद्वारे पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधला आणि पोलिस बंदोबस्त वाढवण्याच्या, तसेच काही भाग प्रतिबंधित करण्याच्या सूचना दिल्या. तहसीलदार आणि वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही ते सतत संपर्कात होते. नागरिकांना कोणतीही हानी न होता नियोजनबद्ध पद्धतीने बिबट्याला जेरबंद करण्यात आले. रेस्क्यू पथकाच्या सदस्यांनी केलेल्या कार्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी पथकाचा सत्कार केला आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
0 comments:
Post a Comment