चंद्रपूर:जनतेची मागणी नसताना सुरू करण्यात आलेली नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस नियमित तोट्यामुळे रेल्वे मंत्रालयाला बंद करावी लागणार असा दावा जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे केला.
Nagpur-Secunderabad Vande Bharat Express will be stopped
निवडणुकीच्या तोंडावर जनतेची दिशाभूल करण्यासाठी नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. रेल्वे सेवेच्या बाबत चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाचा जनविकास सेनेतर्फे 25 सप्टेंबर रोजी एका पत्रकार परिषदेत पर्दाफाश करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे एकूण 800 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या 42 वंदे भारत एक्सप्रेस योग्य मार्गाअभावी रेल्वे विभागाकडे पडून असल्याची माहिती एका वर्तमानपत्रामध्ये नुकतीच प्रकाशित झाली. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर या भागातील जनतेची कोणतीही मागणी नसताना नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस लादण्यात आली का ?असा प्रश्नही जनविकास सेने तर्फे उपस्थित करण्यात आला आहे.ट्रेनला प्रवासी मिळे ना
आक्युपन्सी रेट केवळ 15-20%
80-85 % खुर्च्या रिकाम्या
16 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. या ट्रेनचा आक्युपन्सी रेट(occupancy rate) आतापर्यंत वीस टक्के पेक्षा जास्त गेलेला नाही.या गाडीत चेअर कारचे 18 तर एक्झिक्युटिव्ह क्लासचे 2 असे एकूण 20 डबे आहेत. 20 डब्ब्यातील एकूण 1440 आसनांपैकी 80 ते 85 टक्के आसने रिक्त राहतात. मागील दहा दिवसात या गाडीचा आक्युपन्सी रेट 15 ते 20 टक्क्यांच्या वर गेलेला नाही. ट्रेनमध्ये सेवा देण्यासाठी नियुक्त 80 च्या जवळपास कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च निघणेही शक्य नाही. त्यामुळे लवकरच डब्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. प्रवाशी संख्या वाढण्याची शक्यता नसल्याने ट्रेन बंद करावी लागणार असा जनविकास सेनेचा दावा आहे.
तिकिट दर कमी करणे हाच एकमेव उपाय
नागपूर किंवा बल्लारपूर वरून दररोज 10 ते 15 गाड्या सिकंदराबाद( हैदराबाद) साठी धावतात. शताब्दी,राजधानी व दुरांतो एक्सप्रेस सारख्या गाड्यांचा यामध्ये समावेश आहे. 4 ते 6 गाड्यांचा चंद्रपूरला सुद्धा दररोज थांबा असतो.
वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर स्लीपर पेक्षा चार पटीने व 3 टायर एसी पेक्षा दीडपट जास्त आहेत. लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा हा अखेरचा टप्पा असल्याने रिझर्वेशन सहज मिळते. प्रवास करण्यासाठी एक दोन तास जास्त लागत असले तरी पैशाची मोठी बचत होते. नागपूर वरून वंदे भारतच्या एक्झिक्युटीव्ह क्लासचे तिकीट दर विमानापेक्षा अर्धे आहे. विमानाने प्रवासाला दीड तास तर वंदे भारत ने 7 तासाच्या वर लागतात.वेटिंग तिकीट रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतल्याने स्लीपर क्लासची गर्दी कमी झाली. प्रवास करण्यासाठी एक दोन तास अधिक लागले तरी 300 रुपये स्लीपरचा तिकीट दर हा सामान्य प्रवाशांसाठी खूप परवडणारा आहे. त्यामुळे वंदे भारत च्या चेअर कार व एक्झिक्युट क्लासच्या तिकीट दरामध्ये मोठी कपात केल्याशिवाय वंदेभारत एक्सप्रेसला प्रवासी मिळणे शक्य नाही असे मत देशमुख यांनी व्यक्त केले.
0 comments:
Post a Comment