घाटंजी :- (तालुका प्रतिनिधी) शासनामार्फत विविध स्तरावरील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. दारिद्र्यरेषेखाली मोडणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची अशी एक राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना. घाटंजी तहसील कार्यालयात गेल्या वर्षभरात अर्थसाहाय्य निधी उपलब्ध नसल्याने अनेकांची लाभार्थींची हिरमोड झाली आहे,
Oh Saheb, when will you get the benefit of National Family Financial Assistance Scheme?
शासनाने मोठा गाजावाजा करीत योजना राबविली परंतु ही योजना नामशेष आहे की काय?अशी लाभार्थ्यांना ओरड आहे. घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर संकट कोसळते. अशा स्थितीत त्यांना मदत करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. मात्र शासन यासाठी वेळेत निधी उपलब्ध करुन देत नसल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांची परवड होत आहे. शासनातर्फे विविध नवीन योजना सुरू करुन त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे.आपला पक्ष मजबूत करण्याच्या हेतूने नव्या योजनांची खैरात वाटत आहे. मात्र जुन्याच योजनांची अंमलबजावणी योग्य तऱ्हेने करीत नसल्याचे चित्र आहे.अतिरिक्त निधीची तरतूद करा कुटूंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत योजनेच्या सुरूवातीला तहसील कार्यालयात अतिरीक्त निधी उपलब्ध करुन दिला जात होता. परिणामी प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर होताच आठ दिवसात लाभार्थ्याना अर्थसहाय्य दिले जात होते. मात्र गेल्या २ ते ३ वर्षापासून या योजनेच्या निधीत कपात करण्यात आली. तसेच अतिरिक्त निधी सुध्दा उपलब्ध करुन दिला जात नाही. त्यामुळे प्रलंबित अर्जाच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे पूर्वीसारखाच अतिरिक्त निधीची तरतूद करण्याची मागणी लाभार्थींकडून होतं आहे.
0 comments:
Post a Comment