घाटंजी तालुका प्रतिनिधी :-रामपुर येथील राजेंन्द्र गोबाडे सर यांना जिल्हा परिषदेचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला व येरंडगांव शाळेचे मुख्याध्यापक रमेशजी ताटेवार सर यांना केन्द्रभुषण पुरस्कार देण्यात आला.त्यानिमित्ताने अनंतराव कटकोजवार सर यांच्या निवासस्थानी घाटंजी तालुका गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
On behalf of Ghatji Taluka Gurudev Seva Mandal, the felicitation program of Ardash teachers was concluded
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ मेश्राम साहेब पशुधनविकास अधिकारी, तसेच प्रमुख उपस्थिती सागर विठाळकर बालविकास अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्वश्री अनंतराव कटकोजवार सर अध्यक्ष सेवा मंडळ, अरूण मानकर तालुका सेनाधिकारी, सुभाष देवळे सदस्य केन्द्रीय प्रचार विभाग मोझरी, जितेंद्र जुनगरे मध्यवर्ती प्रतिनिधी रविभाऊ कावळे भजनप्रमुख, सोनटक्के दादा, हनुमान कुमरे भजन प्रमुख, पवारसाहेब, शिवम देवळे, विशाल कटकोजवार, शिंदेभाऊ, अक्षय नगराळे,संदीप वाघाडे,दिवाकर कोवे, जितेंद्र दुल्लरवार,कटकोजवारताई, मेश्रामताई,यांची उपस्थिती होती. भोजनानंतर लगेच भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. मान्यवर तसेच सत्कारमुर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरूण मानकर सर व आभार कटकोजवार सर यांनी मानले.
0 comments:
Post a Comment