चंद्रपुर :-चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, मा. अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांनी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पथकांना आदेशीत केले होते.
7,58,096 from Chandrapur city Seizure of illegal flavored tobacco
पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना शहरात प्रभावी पेट्रोलींग करून अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने दिनांक 08/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी गोपनीय बातमीदाराचे माहीती वरून स्थागुशा. येथिल अधिकारी व कर्मचारी पो.स्टे. रामनगर हददीमध्ये पेट्रोलींग करीता असतांना मुखबिर व्दारे खबर मिळाली की, नामे प्रमकुमार बाबुराव बेले, वय 50 वर्ष, धंदा-पान मटेरीअल विकीरा. दत्त नगर नागपुर रोड ता. जि. चंद्रपुर हा आपले पान मटेरिअलचे दुकाणात व घरी दत्त नगर नागपुर रोड ता. जि. चंद्रपुर येथील दुकाणात अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखु बाळगुण विक्री करीत आहे अश्या खबरेवरून घरी छापा मारला असता दुकाणामध्ये व घरी अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखु मिळुन आला. असा एकुण मुददेमाल 7,58,096/-रू. चा माल जप्त करून आरोपी विरूध्द पो.स्टे. रामनगर येथे अपराध कमांक 932/2024 कलम 223, 275, 123 भारतीय न्याय संहिता 2023, सहकलम 30 (2), 26 (2) (प), 26 (2) (पअ), 59 अन्न सुरक्षा आणी मानके अधि. गुन्हा नोंदकरण्यात आला आहे.
सदर कर्यवाही स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक श्री. महेश कोंडावार यांचे मार्गदशनात पोउपनि. संतोष निभोरकर, पोउपनि. विनोद भुरले, पो.हवा. जयंत चुनारकर, नितेश महात्मे, चेतन गज्जलवार, पोअं. किशोर वाकाटे, अमोल सावे, प्रफुल गारघाटे, चापोहवा दिनेश अराडे यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment