Ads

लोकभावना लक्षात घेता बाबुपेठ उड्डाणपुल उद्या 10 ऑक्टोबर ला वाहतुकीसाठी खुला करणार - आ.किशोर जोरगेवार

चंद्रपुर :- बापूपेठ उड्डाणपुलाचे काम पुर्ण झाले आहे. मात्र लोकार्पण अभावी पुल नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांची भावना लक्षात घेउन आपण हा पुला उद्या 10 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता वाहतुकीसाठी खुला करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट केले आहे.
Keeping in view the public sentiment, Babupeth flyover will be opened for traffic tomorrow on October 10. MLA.Kishore Jorgewar
आज संबंधित सर्व अधिका-यांसह त्यांनी बाबुपेठ उड्डाण पुलाची पाहणी केली. यावेळी पुलाचे काम जवळपास पुर्ण झाले आहे. त्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यास अडथळा नसल्याचे अधिका-यांनी म्हटले आहे. त्यानंतर हा पुल उद्याच वाहतुकीला सुरु करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
50 ते 60 हजार लोकवस्ती असलेल्या बाबुपेठ उड्डाण पुलाच्या कामात अनेक अडथळे आलेत. मात्र आता हा पुल बनून तयार झाला आहे. यासाठी शेवटच्या टप्यात लागणार असलेल्या 5 कोटी 90 लक्ष रुपयांचा निधी आमदार किशोर जोरगेवार यांनी मंजूर करुन आणला होता. त्यानंतर या निधीतून पुलाचे उर्वरित काम पुर्ण करण्यात आले आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकारी आणि बाबूपेठच्या नागरिकांसह पुलाची पाहणी केली. सदर पुल हा बाबूपेठकरांसाठी अत्यंत महत्वाचा आहे.
पूढे दसरा आणि दिक्षाभुमीचा कार्यक्रम आहे. यासाठी मोठ्या संख्येने येथून नागरिक रहदारी करणार आहे. त्यामुळे हा पुल आपण नागरिकांना वाहतुकीसाठी उद्याच १० ऑक्टोबरला सुरु करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. वास्तुचे लोकार्पण होणे हा शासकीय पध्दतीचा भाग आहे. मात्र यासाठी येथील हजारो नागरिकांना वेटीस धरणे योग्य नाही. पुलाचे काम पुर्ण झाले आहे. हा सुरु करावा अशा मागण्या या भागातील नागरिकांच्या होत्या शेवटी हा पुल या लोकांच्या सोयीसाठीच आहे. त्यामुळे नागरिकांची भावना लक्षात घेता आपण हा उद्या ऑक्टोबरला सुरु करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment