जावेद शेख भद्रावती : गुरुदृष्टी नेत्रालय, लहान हनुमान उत्सव समिती आणि विंजासन ग्रामवासी यांचे संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, बीसीजी लसीकरण, रक्तदान व दंत चिकित्सा शिबिर पार पडले. या शिबिराचा २ हजाराचे वर रुग्णांनी लाभ घेतला.
सदर शिबिर विंजासन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात दि,४ ऑक्टोबरला पार पडले. उद्घाटन मुख्याध्यापिका अनिता पेंदाम यांचे हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. चेतन खुटेमाटे होते. तर डॉ. रमेश मिलमिले, डॉ. शंकर ठावरी, डॉ. आशिष देवतळे, डॉ. कमलेश वैरागडे, डॉ. अनंत मत्ते,जयप्रकाश लोणगाडगे, डॉ.सुमित दुर्योधन डॉ. मीनाक्षी दुर्योधन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुरुवातीला राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून शिबिरास सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना आरोग्याचे महत्त्व समजून सांगितले. शिबिराच्या सुरुवातीस ३० जणांनी रक्तदान केले, नंतर १३६४ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांसह ४५० नागरिकांची दंत तपासणी,१०७ जणांना बीसीजी लस देण्यात आले. रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. शिबिर यशस्वी करण्यास लहान हनुमान देवस्थान उत्सव समितीसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
0 comments:
Post a Comment