Ads

पंडित दीनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठ मथुरा तर्फे सौ.माया रमेश राजूरकर यांना ‘विद्यावाचस्पती’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सादिक थैम वरोरा: सौ.मायाताई रमेशराव राजुरकर यांच्या विषयी सांगायाचे झाल्यास स्त्री सक्षमीकरणाचे आदर्श म्हणून वरोरावभद्रावती तालुक्यामध्ये एक वेगळी ओळख सौ. मायाताई राजूरकर यांनी निर्माण केली आहे.
Pandit Deendayal Upadhyay Hindi University, Mathura conferred 'Vidyavachaspati' award to Mrs. Maya Ramesh Rajurkar.
गेले 20 वर्ष त्यांनी हिरालाल लोया विद्यालय वरोरा येथे हिंदी विषयाची शिक्ष‍िका म्हणुन सेवा दिली. तसेच सोबत सामाजिक कार्याची आवड असल्याने समाजाप्रती आदर ठेऊन वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये सौ मायाताई राजूरकर सातत्याने सहभाग घेतात. तसेच गेल्या 20 वर्षा पासुन तालूका विधी सेवा प्राधिकरण या शासकीय समितीवर सदस्य पदावर कार्यरत आहे. सोबतच वरोरा व भद्रावती तालुक्यामध्ये शिक्षणापासुन सामान्य जनता वंचित राहू नये करीता विवेकानंद ज्ञानपीठ कॉन्हेंट या शैक्षणिक संस्थेमध्ये सौ. मायाताई राजुरकर यांची कार्यकारणी सदस्य या पदावर अविरथ सेवा चालू आहे. धनोजे कुनबी समाजाचा विकास होण्याकरिता माजी संस्थापक अध्यक्ष,वरोरा तालुका धनोजे कुनबी महिला आघाडी, वरोरा या समिती मार्फत समाजजागृती उपक्रम राबविले आहे.गेल्या पाच वर्षापासुन जय गुरुदेव स्वच्छ जल संस्थे मध्ये सल्लागार या पदावर कार्यरत होत्या व विवेकानंद प्राथमिक तथा उच्च माध्यमिक शाळे मध्ये शिक्षक तज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
तसेच सौ. मायाताई राजूरकर टायणी मिनरल्स लि. मध्ये संचालक पदावर कार्यरत असुन एक यशस्वी उद्योजक आहेत. अशाच अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे अवलोकन करुन तसेच हिंदी विषयाचे आवड व त्यांचे कार्य अविरथ सुरु असल्याने पंडीत दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ वृन्दावन धाम ( मथुरा ) उत्तरप्रदेश यांच्या मार्फत सौ. मायाताई रमेशराव राजूरकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना दिनांक 29/09/2024 ला पंडीत दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठाचे कुलपति मा. डॉ इन्दु अरविन्द भूषण मिश्रा जी यांच्या हस्ते विद्या वाचस्पती सारस्वत सम्मान प्रदान करण्यात आला. सदर सम्मान सोहळा हा हॉटेल रेडिसन ब्लू दिल्ली पश्मिम बिहार नई दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.या सम्मान सोहळ्यामध्ये पं.दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ प्रमुख अतिथी पद्मश्री मा. डॉ मा. अरविन्द कुमार जी, पुर्व कुलपति रानी लक्ष्मीबाई केन्द्रीय कृषि विश्वविद्यालय झांसी, प्रमूख वक्ता श्रीमती दीपा मिश्रा जी और प्रमुख मार्गदर्शक मा.शिवाजी शिंदे उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment