राजुरा :- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल येथे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय गुरुवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे महाराष्ट्रची दीर्घकाळापासुंनची मागणी पूर्ण झाल्याने आदर्श शाळेतील विध्यार्थीनी "माय मराठी"असे विध्यार्थीसाखळी तयार करून आनंदोत्सव साजरा केला.
"My Marathi" student chain at Adarsh Marathi Primary Vidyamandir School.
राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख, स्काऊट मास्तर बादल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब, स्काऊट्स -गाईड्स युनिट व इतरही विध्यार्थीनी या साखळीत सहभाग घेतला. यावेळी आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जाभूळकर, आदर्श प्राथमिक चे शिक्षक रुपेश चिडे, ज्योती कल्लूरवार, रोशनी कांबळे, जयश्री धोटे, सुनीता कोरडे, वैशाली टिपले, अर्चना मारोटकर, रजनी पिदुरकर, प्राजक्ता साळवे, माधुरी रणदिवे, वैशाली चीमुरकर , मनीषा लोढे , पूजा इटनकर, आदर्श हायस्कूल चे शिक्षक नवनाथ बुटले, प्रशांत रागीट, विकास बावणे, मेघा वाढई, आशा बोबडे, भाग्यश्री क्षीरसागर, अंजली कोंगरे आदींची उपस्थिती होती. यापूर्वी सुद्धा आदर्श शाळेने अनेक सामाजिक, पर्यावरणीय संदेश विद्यार्थी साखळी च्या माध्यमातून दिले आहे.
0 comments:
Post a Comment