Ads

अवैद्य सुगंधीत तंबाखु विक्री करणाऱ्या विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुरची कार्यवाही .

चंद्रपुर :-चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अम्मर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांनी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पथकांना आदेशीत केले होते.
Proceedings of he Local Crime Branch, Chandrapur against sellers of uncured flavored tobacco
पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना शहरात प्रभावी पेट्रोलींग करून अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने दिनांक 04/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी गोपनीय बातमीदाराचे माहीती वरून स्थागुशा. येथिल अधिकारी व कर्मचारी पो.स्टे. गोंडपिपरी हददीमध्ये पेट्रोलींग करीता असतांना मुखबिर व्दारे खबर मिळाली की, गजानन शंकर तेल्कापल्लीवार, वय-54 वर्ष, धंदा-पान मटेरीअल विकी रा. वार्ड कमांक 1 करंजी ता. गोंडपिपरी जि चंद्रपुर व दुकाण आलापल्ली मेनरोड गोंडपिपरी, ता. गोंडपिपरी, जिल्हा चंदपुरयाचे लक्ष्मीनंदन ट्रेडस दुकाणामध्ये अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखु बाळगुण विक्री करीत आहे अश्या खबरेवरून दुकाणात छापा मारला असता दुकाणाचे मागचे खोलीत व मालवाहु वाहणामध्ये अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखु मिळुन आला वाहन व मुददेमाल असा एकुण 4,71,880/-रु. चा माल जप्त करून आरोपी विरूध्द पो.स्टे. गोंडपिपरी येथे अपराध क्रमांक 280/2024 कलम 223, 275, 123 भा.न्या.सं. सहकलम 30 (2) 26 (2) (पअ), 3, 4, 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कर्यवाही स्थानिक गुन्हे शाखा' चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक श्री. महेश कोंडावार यांचे मार्गदशनात पोउपनिः मधुकर सामलवार, पो.हवा. जयंत चुनारकर, सुभाष गोहोकार, चेतन गज्जलवार, पोअं. किशोर वाकाटे, अमोल सावे यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment