चंद्रपुर :-बल्लारपूर शहरात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या चमूने अवैध सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर छापा मारला असता त्याठिकाणी 53 हजार 819 रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला.
In Ballarpur, the local crime branch arrested a person selling illegal flavored tobacco
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आंबेडकर वार्ड येथील नीरज शाहू हा भाड्याने रूम घेऊन त्याठिकाणी अवैध सुगंधित तंबाखूचा साठा बाळगत विक्री करीत आहे.
माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने त्याठिकाणी धाड मारली, सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त करीत आरोपी नीरज शाहू वर पो.स्टे. बल्लारपूर येथे अपराध क्रमांक 962 /2024 कलम 223, 275, 123 भा.न्या.सं. 2023 सहकलम 30 (2) 26 (2) (पअ), 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. दीपक काँक्रेडवार, पोउपनि विनोद भुरले,पो हवा. किशोर वैरागडे, रजनीकांत पुट्टावर, सतीश अवतरे सर्व स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर
0 comments:
Post a Comment