जावेद शेख भद्रावती:
Swachh Survekshan 2024 under Majhi Vasundhara Abhiyan
स्वच्छ सर्वेक्षण २०२४ माझी वसुंधरा अभियानांतर्गत भद्रावती नगर परिषदेने हाती घेतलेल्या स्वच्छता ही सेवा २०२४ अभियानातील नागरिकांचा सहभाग या घटकांतर्गत आयोजित चित्रकला स्पर्धेत अन्वी वतन लोणे हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
Anvi Lone first in painting competition of Nagar Parishad Bhadravati
स्वच्छता ही सेवा २०२४ हे अभियान भद्रावती नगर परिषदेतर्फे १४ सप्टेंबर ते १ऑक्टोबर २०२४ या पंधरवाड्यात राबविण्यात आले. याच अभियानाचा एक भाग म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधींना त्यांच्या जयंती निमीत्त आदरांजली अर्पण करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
यामध्ये वर्ग १ ते ४ या क गटातून लोकमान्य ज्ञानपीठ येथे वर्ग ४ मध्ये शिक्षण घेत असलेली अन्वी वतन लोणे हीने प्रथम क्रमांक पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र तसेच सायकल देवून अन्वीला गौरविण्यात आले.
यावेळी नगर परिषद भद्रावतीच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. विशाखा शेळकी, उपमुख्याधिकारी विजयकुमार जांभुळकर, लिपीक (आरोग्य विभाग) दिनेश माशीरकर, स्वच्छता निरीक्षक उमेश ब्राम्हणे, शहर समन्वयक कलीम शेख यांनी कौतुक केले. सदर उपक्रम यशस्वी करण्याकरिता भद्रावती नगर परिषद येथील आरोग्य विभाग व पाणीपुरवठा विभाग यांनी परिश्रम घेतले.
0 comments:
Post a Comment