चंद्रपुर:-चंद्रपूरच्या तुकूम येथील संविधान चौकात स्थित राजगिरी बुद्धविहारमध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर टाटा ट्रस्ट्सच्या 'कॅन्सर-फ्री इंडिया''Cancer-Free India' उपक्रमांतर्गत टाटा कॅन्सर केअर फाऊंडेशन आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. शिबिराची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून व सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन करण्यात आले.
या शिबिरात कॅन्सर, हृदयरोग, अस्थीरोग, ब्लड प्रेशर, शुगर, रक्त तपासणी, तोंडाचे आजार, स्तनातील गाठी, मासिक पाळी संबंधित आजार, थॉयरॉईड, हिमोग्लोबिन, कॉलेस्ट्रॉल, लिव्हर आणि किडनीसंबंधी तपासण्या मोफत करण्यात आल्या. यावेळी 200 च्या वर नागरिकांची शिबिरा मध्ये तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासण्या करण्यात येण्यासाठी प्रसिद्ध हृदयरोग विशेषज्ञ डॉ. प्रदीप वरघने, अस्थिरोग तज्ञ डॉ. अक्षय यमनुरवार, टाटा कॅन्सरचे डॉ. आशिष बारब्दे, सामान्य तपासणी करिता डॉ. हिमांशू गंधेवार उपस्थित होते.
यावेळी टाटा हॉस्पिटलचे डॉ. ट्विंकल डेंगळे,सुरज साळुंके,ज्योती मुरमाडकर,वैष्णवी सहारे रेड क्रॉस चे सुभाष मुरस्कार, आरिफ काझी तसेच सामान्य रुग्णालय चंद्रपूरचे नर्सिंग स्टाफ व हिंद लॅबस चे कर्मचारी उपस्थित होते.
या शिबिराच्या आयोजनासाठी सामाजिक कार्यकर्ते व रेडक्रॉस चे युवा समन्वयक डॉ. पियुष व्ही. मेश्राम यांनी पुढाकार घेतला. शिबिराच्या यशस्वी ते करिता राजगिरी बुद्ध विहार चे कुसुमताई माऊलीकर, ललीता कातकर, अनिता रायपुरे, भाऊराव सागारे, राजेश वाकडे, दशरथ चादेकर, अरविंद ब्राम्हणे, दिनेश काटकर, कपिल रामटेके, गंगाधर भगत, अशोक गेडाम यांसारख्या मान्यवरांनी महत्त्वाची भूमिका निभावली.
0 comments:
Post a Comment