(प्रशांतगेडाम)सिंदेवाही-Illegal sand transportअवैध रेती वाहतुक करणाऱ्यां ट्रॅक्टर वाहन क्रमांक - MH34,CD-6787 ,चा चालक कुठलाच धाक न बाळगता भरधाव दिवसाढवळ्या मंगळवारी सकाळी दहा वाजता च्या सुमारास सिंदेवाही- ते नवरगाव मार्गाने अवैध गौण खनिज वाहतूक करीत असल्याचे माहिती गौण खनिज प्रकरणी गस्त घालत असलेल्या सिंदेवाही नायब तहसिलदार मंगेश तुमराम यांना मिळताच यांनी सिंदेवाही नवरगाव मार्गावरील लाडबोरी येथे सदरच्या ट्रॅक्टर थांबवून चौकशी केली असता ट्रॅक्टरमध्ये 1 ब्रास रेती असल्याचे निदर्शनास आले आणि वाहनचालका कडे रेती गौण खनिज वाहतुकीचा परवाना नसल्याचे आढळून आले.
Tractors carrying illegal sand seized at Ladbori
त्यामुळे ट्रॅक्टर (क्रमांक MH 34 CD6787) आणि क्रमांक नसलेली ट्रॉली सिंदेवाही तहसील कार्यालय येथे आणून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सिंदेवाही तहसीलदार संदीप पानमंद यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार मंगेश तुमराम यांनी केली, सदरच्या अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर 1 लाख 17 हजार 160 रुपयांचा दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती तहसीलदार संदीप पानमंद यांनी दिली.तसेच अशीच कडक कारवाई सातत्याने सुरु राहणार असल्याचे तहसिलदार यांनी सांगितले आहे.
0 comments:
Post a Comment