चंद्रपुर:- दिनांक 01/11/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी रात्रौ पो.स्टे. भिशी हददीत पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, मौजा शंकरपूर शेत-शीवारात काही इसम 52 तासपत्ते जुगार खेळ खेळत आहे, अशी खात्रीशीर माहीतीवरुन मौजा शंकरपुर शेत शीवारात जुगार रेड करून अखिल गुलाबराव मुनघाटे वय 39 वर्षे रा . हिरापुर ता. चिमूर व ईतर 6 इसमांना जुगार खेळताना जागेवरून पकडुन ७ व ईतर इसमांवर महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये कारवाई करण्यात आली.
Gambling raid at Shankarpur in Bhisi area
घटनास्थळावरून जुगारातील नगदी 41,500/- ₹ व 05 मोसा, व ईतर साहित्य कि. 3,36,300/- रू असा एकूण 3,77,800/- रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष कारवाई करून जप्त करण्यात आला. आरोपीतां विरुध्द पो.स्टे.भीसी येथे अपराध क्रमांक 201 /2024 कलम 12 (अ ) म.जु.का.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई Api बलराम झाडोकार यांच्या मार्गदर्शनात ,दिपककाक्रेडवारPsi मधुकर सामलवार , संतोष निभोरकर पो हवा. किशोर वैरागडे, रजनीकांत पूठावार, नापोअ संतोष येलपूलवार पो.आ गोपाल आतकुलवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर यांनी केली
0 comments:
Post a Comment