चंद्रपुर :- Murder दि.१५/१०/२०२४ रोजी महाकाली वार्ड चंद्रपूर येथिल आर्यन वासुदेव आरेवार यास महाकाली वार्डातील काही लोकांनी संघनमत करून जुन्या वादावरून वैमनस्यातुन कट रचुन धारधार हत्याराने मारहान करून त्याचा खुन murder केला व घटनास्थळावरून मोटार सायकल ने पसार झाले अशी माहिती पो.नी महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना प्राप्त होताच
Local Crime Branch, Chandrapur arrested all the three accused in the Mahakali colliery murder in just two hours.
मुम्मका सुदर्शन, पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन तांत्रीक व कौशल्यपुर्ण तपास करून अवघ्या दोन तासातच सदर पळून गेलेल्या आरोपीस मोटर सायकल सह मौजा चुनाळा ता. राजूरा येथे पकडण्यात आले. पकडलेल्या आरोपीतांचे नाव १) अश्वीन उर्फ बंटी राजेश सलमवार वय २८ वर्षे रा. महाकाली कॉलरी चंद्रपूर २) जॉन विलास बोलीवार वय १९ वर्षे रा. लालपेठ कॉलरी नं. १ चंद्रपूर ३) जसिम नसीम खान वय २४ वर्षे रा. जमनजटी दर्गा जवळ, चंद्रपूर असे असून तीन्ही आरोपीतांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने वर नमुद आरोपीस पुढिल तपासा करिता पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर यांचे ताब्यात देण्यात आले.सदरची यशस्वी कामगीरी मा मुम्मका सुदर्शन पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पो.नि. महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक कांकेडवार, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पो.हवा. सुभाष गोहोकार ना. पो. कॉ संतोष येलपूलवार, पो.कॉ. गोपीनाथ
नरोटे, गोपाल आतकूलवार, मिलींद जाभळे दिनेश अगडे यांनी केली
0 comments:
Post a Comment