चंद्रपूर : या देशाची लोकशाही वाचवन्यासाठी निधर्मी पक्षासोबत राहिले पाहिजे ही भीम शक्ती संघटनेचची भूमिका असुन महिलांवरील अन्याय अत्याचारविरुद्ध खंभीरपने लढण्याकरिता भीम शक्ती संघटना सक्षम आहे,दलित आदिवासी ओबीसी सह इतर समाजासोबत नेहमीच भीम शक्ती असेल, असे भीम शक्ती संघटनेचे संस्थापक खासदार चंद्रकांतजी हंडोरे म्हणाले. ते चंद्रपूर जिल्हा भीम शक्ती संघटना वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये बोलत होते.
To save the democracy of the country with the irreligious parties -MP. Hadore
खासदार हंडोरे पुढे म्हणाले की, मी मंत्री असतेवेळी चंद्रपूर येथे पहिले सामाजिक न्याय भवन उभे केले असुन महाराष्ट्र राज्यातील गरीबातील गरीब विध्यार्थी उच्यशीक्षितित झाला पाहिजे यासाठी शभर निवासी शाळा व वसतिगृह निर्माण केली, तसेच बेरोजगार तरुण हे उद्योजक झाले पाहिजे या करिता प्रत्येकी सात कोटीच्या साडेचारसे औदेगिक सहकारी संस्था सामान्य कार्यकर्त्यास देऊन त्यांना मोठे उद्योजक मी तयार केले आहेत असे हंडोरे यांनी सांगितले. विदर्भ दौऱ्यावर असलेले खासदार चंद्रकांत हंडोरे हे नागपूर दिक्षाभूमी येथील भीम शक्ती वतीने आयोजित केलेल्या धम्मचक्र प्रवर्तन सोहळा संपन्न होताच आज चंद्रपूर जिल्हा भीम शक्तीने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भीम शक्तीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष एन डी पिंपळे प्रा अपेक्षा पिंपळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांना औषध व प्रशासनाचे महाराष्ट्राचे संचालक सुनील भाऊ देगावकर राजू झोडे दीक्षा पाटील प्रेमलाल मानकर लाजर कांबळे सरोज पूणवटकर माया मेश्राम रमा मेश्राम सोनी ब्राह्मणे एडवोकेट शाम खंडारे पियुष धुपे यांचेसह भीम शक्तीचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्तित होते. या कार्यक्रमाचे आयोजन भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष कुणाल गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन कोमल बोरकर यांनी केले या भीमशक्तीच्या मेळाव्याला जिल्ह्यातील बहुसंख्य भीमशक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते
0 comments:
Post a Comment