राजुरा:-कोरपणा तालुक्यातील ग्रामीण भागातील एका अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलाची अग्नीवीर म्हणून निवड झालेली आहे.
The son of a common farmer became Agniveer.
बाखर्डी येथील अल्पभूधारक शेतकरी विनोद दौलत काकडे यांचा मुलगा प्रज्योत याची अग्नीवीर म्हणून देशसेवा करण्यासाठी निवड झालेली आहे. त्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम केले आणि त्याच्या परिश्रमाला अखेर यश प्राप्त झाले व देशसेवेसाठी तो सज्ज झाला. बाखर्डी गावातील व संपुर्ण कोरपणा तालुक्यातून त्याच्या निवडीबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडीलाना दिले आहे.
0 comments:
Post a Comment