Ads

महाविकास आघाडीला धक्का;150 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

बल्लारपूर :-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील पोंभुर्णा तालुक्यात वेळवा आणि चकठाणा या दोन गावांमधील 150 कार्यकर्त्यांनी काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. या घटनेमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
A shock to Mahavikas Aghadi; 150 workers join BJP
गेल्या पंधरा दिवसांत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसला लागलेली गळती अजूनही कायम आहे. यात आता ठाकरे गटाचे कार्यकर्ते पक्ष प्रवेश करीत आहे. 150 जणांनी भाजपमध्ये प्रवेश करताच महाविकास आघाडीसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

वेळवा आणि चकठाणा या दोन गावांमधील एकूण 150 जणांनी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. मौजा वेळवा आणि चकठाणा येथील युवकांनी आज काँग्रेस व शिवसेनेतून (ठाकरे गट) भारतीय जनता पक्षामध्ये ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश घेतला. शिवसेना ठाकरे गटाचे नयन मोरे या युवा नेत्याच्या माध्यमातून वेळवा येथिल कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये पक्ष प्रवेश घेतला. यावेळी पोंभुर्णा तालुक्यातील प्रमूख सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment