Ads

कुणबी समाजाबद्दल गरळ ओकल्याने निषेध

घाटंजी :-निवडणुकीच्या काळात वणी येथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बोदकुरवार यांचे अतिनिकट व भाजपाचे पदाधिकारी असलेल्या सुधीर साळी यांनी कुणबी समाजाविषयी अश्लील भाष्य करून,कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यास अपमानित केले.समस्त कुणबी समाजाब‌द्दल बेभानपणे बोलतांना सुधीर साळी नावाच्या व्यक्तीने ही आमची सत्ता आहे, पुढेही ही सत्ता आमचीच राहील, तुम्ही वाट्टेल तेथे तक्रार करा! आमचे कुणीही काही वाकडे करू शकत नाही! असे भाजप उमेदवारांच्या प्रचार मंडपात बोलत होते.
Protest by the Kunbi community against Sudhir Sali
ही घटना घडल्यानंतर वणी शहरातील अनेक कुणबी समाजातील नागरिकांनी व समाज संघटनेच्या नेत्यांनी संतप्त होऊन सुधीर साळी यांच्या अटकेची मागणी केली, पोलिसात तक्रारही केली. परंतु दडपशाहीने राजकारण करून भाजपच्या उमेदवारांनी साळी यांना अटकेपासून दूर ठेवीत संरक्षण दिले.
जात पात धर्म पंथाच्या नावावर मुद्दाम भांडणे उकरून काढून, दंगल घडविण्याचा मनसुबा भाजपचे नेते करू पाहत आहेत. हा प्रकार लोकशाहीला घातक आहे, ऐन निवडणुकीत जाती- पातीबद्दल नको ते भाष्य करून, ही निवडणूकच वेगळ्या मार्गाने कशी घेऊन जाता येईल, असे षडयंत्र भाजपने व भाजपच्या नेत्यानी व कार्यकर्त्यांनी सुरु करून, हुकूमशाहीचा
प्रकार चालविला आहे. या घटणेचा निषेध नोंदविण्यासाठी तहसीलदारांमार्फत सर्व शाखेय कुणबी समाजातर्फे निषेध करून निवेदन दिले. यावेळी मोरेश्वर वातीले.आशिष लोणकर, अभिषेक ठाकरे, डॉ.विजय कडु,सुभाष गोडे, मनोज ढगले,अनंत चौधरी, नारायण भोयर,ज्ञानेश्वर राऊत, बबनराव ककन, संजय ढगले,वैजंती ठाकरे,स्मिता भोयर,जितेंद्र जुनगरे, सुनील हुड, निखिल देठे, विशाल वातिले, मनोज भुरघाटे,किशोर बेले,विनोद राजुरकर,प्रशांत अवचित,विलास महल्ले,प्रदिप दिडसे,अमोल वानखडे,वामणराव राऊत, योगेश वातिले अंगद मोरे,सचिन सारवे,गणेश रंदई व कुणबी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment