घुग्घूस :- घुग्घुस वर्धा नदीच्या चिंचोली घाट परिसरात रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यावरून महसूल प्रशासनाचे पथकाने मध्यरात्री धाड टाकून पाच ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई केली आहे.
Revenue department action against 5 tractors smuggling illegal sand
वाहन क्रमांक MH 34 AP 2264
MH L 7066,MH 34 AL 1685
MH 34 L 9542,चेसीस no NKTH00969 या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून सुमारे 6.5 लाख दंड वसूल करण्यात येईल.
सदर कारवाई तहसीलदार चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, मंडळ अधिकारी श्री प्रकाश सुर्वे, तलाठी श्री नवनाथ गोडघासे, श्याम खरात, अनूप वगारे यांचे पथकाने केली.
0 comments:
Post a Comment