मूल :-जनतेला आता खऱ्या अर्थाने प्रामाणिक आणि आपल्या नेतृत्वाची ओळख पटू लागली आहे हे आपली लोकशाही बळकट होत असल्याचं आणि जनतेमध्ये जागृती होत असल्याचं लक्षण आहे
मुल येथील बल्लारपूर 72 विधानसभेच्या अपक्ष बहुजनांच्या आणि जनसामान्यांच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अभिलाषा ताई यांच्या प्रचार रॅलीला प्रचंड गर्दी केली
Dr. Abhilasha Tai Gavture's tremendous show of power through election rally at Mul
गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा सातत्याने प्रामाणिकपणे जे काम अभिलाषा ताई गावतुरे करीत आहेत त्याची पोचपावती म्हणूनच जणू जनता त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी करून देत आहे
गेल्या 30 वर्षापासून मतदारसंघांमधील जनता हजारो समस्यांनी ग्रस्त आहे आणि येथील असलेले आमदार आणि विद्यमान पालकमंत्री सपशेल अपयशी ठरलेले आहेत जे प्रश्न जनप्रतिनिधींनी सोडवायचे असतात त्या प्रश्नासाठी अभिलाषा ताई गावतुरे स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत
भूमिपुत्र ब्रिगेडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन असेल करियर गायडन्स असेल गावोगावी वाचनालयाचा आणि अभ्यासिकेचा उपक्रम असेल विद्यार्थ्यांच्या बसेसच्या प्रॉब्लेम असेल अभिलाषा ताई यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत राहिले आहेत जे निवडून आलेले जनप्रतीनिधीही करत नाही ते प्रश्न ते स्वतः उचलतात नवेगाव मोरे येथे दोनशे विद्यार्थ्यांसाठी फक्त दोन शिक्षक होते अभिलाषा ताईंनी आंदोलन करून तेथील शाळेला तीन शिक्षक मिळवून दिले मामल्याच्या विद्यार्थ्यांना चंद्रपूरच्या शाळेत जायसाठी बस नव्हती विद्यार्थ्यांना घेऊन परिवहन विभागासमोर त्यांनी आंदोलन करून तिथे बस उपलब्ध करून दिली शेतकऱ्यांच्या पिक विमा च्या प्रश्नावर आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या प्रश्नांना घेऊन एक मोठे आंदोलन उभारले वाघांच्या हल्ल्यामध्ये ठार होतले असलेल्या शेतकऱ्यांच्या आणि गुराख्यांच्या प्रश्न मोठ्या प्रमाणावर उचलून धरला मेंढपाळांच्या चराईच्या प्रश्नावर अगदी वनविभागाच्या प्रधान सचिवांपर्यंत धाव घेऊन तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले
आपल्या डॉक्टरांच्या मोठ्या चमुच्या माध्यमातून अतिदुर्गम जंगलातील गावोगावी जाऊन वैद्यकीय सेवा प्रदान केल्या
पाणीपुरवठा विभागाच्या मजुरांच्या शोषणाचा प्रश्न त्यांनी जिल्हा परिषद च्या प्रशासनासमोर लावून धरला आणि त्यांना न्याय मिळवून दिला
शाळेच्या खाजगीकरणाचा प्रश्न असो किंवा नोकऱ्यांच्या कंत्राटीकरणाचा प्रश्न सर्व समाजाचे नेतृत्व करत अभिलाषा ताईंनी अनेक आंदोलने उभी केली 26 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ओबीसी जनगणनेसाठी निघालेल्या विशाल ओबीसी मोर्चाचे नेतृत्व सुद्धा अभिलाषा ताई आणि डॉक्टर राकेश गावतुरे यांनी केले.
विधानसभेतील आदिवासी समाजातील लोकांवर प्रशासनाद्वारे आणि वनविभागाद्वारे जेव्हा अन्याय अत्याचार करण्यात आले आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले तेव्हा सर्वप्रथम अभिलाषाताई गावतुरे यां त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या या सर्व कार्यक्रम आणि आंदोलनाच्या माध्यमातून विधानसभेतीलच नव्हे तर सर्व जिल्ह्यातील ओबीसी आंबेडकरी आदिवासी अल्पसंख्यांक आणि सर्व समाजामध्ये अभिलाषा ताईंचा चाहता वर्ग प्रचंड प्रमाणात निर्माण झालेला आहे
आणि म्हणून गावोगावी गल्लोगल्ली त्यांच्या प्रचार सभेला मतदार प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत आज मुल येथे झालेल्या हजारो लोकांच्या रॅलीने सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या मनात धडकी भरत आहे
0 comments:
Post a Comment