Ads

जिल्हा शासकीय रुग्णालयातील अस्वच्छतेवर 'आप'चा आक्षेप

चंद्रपूर: जिल्ह्यातील एकमेव जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या सुविधांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सतत तक्रारी येत असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी दिली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारीच्या आधारे आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाचा दौरा केला असता, सुरक्षा आणि स्वच्छतेचा अभाव दिसून आला. शौचालयांत अत्यंत अस्वच्छता आढळली, तर डिलिव्हरी वॉर्डच्या बाहेर सांडपाणी चोक झाल्यामुळे रस्त्यावर सांडून होते, ज्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी बनविलेली जागा दूषित झाली होती.
AAP objects to the unsanitary conditions in the district government hospital
या समस्यांवर अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. "स्थानिक आमदारांना ही परिस्थिती दिसत नाही का? विकासाची फक्त चर्चा करून आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष करणे हा गंभीर प्रश्न आहे," असे कुडे यांनी सांगितले. त्यांनी आमदारांना आव्हान दिले की, एक दिवस तरी स्वतः या रुग्णालयात उपचार घ्यावेत, म्हणजे परिस्थितीची जाणीव होईल.

यावेळी 'आप'चे वरिष्ठ नेते सुनील दे. मुसळे, जिल्हा युवा अध्यक्ष राजू कुडे, जिल्हा संघटनमंत्री भिवराज सोनी, योगेश मुऱ्हेकर, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, शहर संघटनमंत्री संतोष बोपचे, युवा जिल्हा संघटनमंत्री मनीष राऊत, अनुप तेलतुंबडे आदी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment