चंद्रपुर :-आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या शुक्रवारी चंद्रपूर दौऱ्यावर असून, चांदा क्लब येथील भव्य मैदानात त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी भाजपचे स्टार प्रचारक चंद्रपूरात येत असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची चंद्रपूर आणि घुग्घुस येथे भव्य सभा पार पडली आहे. तर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी 4 वाजता सदर सभा आयोजित करण्यात आली असून, चांदा क्लब मैदानात ही सभा पार पडणार आहे. या सभेची जय्यत तयारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. सभेला महायुतीचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment