Ads

भारतीय आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमात समाज संघटनेचा चक्रधर मेश्राम यांना जाहीर पाठिंबा

ब्रम्हपुरी:- दि.१५/११/२०२४:- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात शेतकरी ऊस या चिन्हावर उभे असलेले अपक्ष उमेदवार चक्रधर मेश्राम यांना भारतीय आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमात समाज संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा मिळाला असल्याने त्यांना निवडून येण्यासाठी फार मोठे सहकार्य होणार आहे. असे मत संस्थापक अध्यक्ष साहेबराव बागुल यांनी व्यक्त केले आहे.
Indian Tribal Nomadic Freed Caste Jamaat Samaj Organization's public support for Chakradhar Meshram.
ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात सर्वत्र आदिवासी, भटक्या विमुक्त जाती जमातींचे खुप मतदार असून त्यांचा फायदा चक्रधर मेश्राम यांना होणार आहे. त्याबरोबरच ऊस शेतकरी हे महत्त्वाचे अन्नदात्याचे चिन्ह मिळाले असल्याने शेतकरी, कामगार यांचेही मतं मिळणार आहेत. पंजा आणि कमळाचे लढाईत सुज्ञ नागरिक शेतकरी या चिन्हावर बटन दाबून विजयी करणार असल्याचे राजकीय घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या जाणकारांचे म्हणणे आहे. आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमाती समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव बाबर, नाशिक जिल्हाध्यक्ष अशोक शिवाजी चव्हाण , विभागीय अध्यक्ष संजय शिंदे , उपाध्यक्ष हरिष बाबर , नंदुरबार जिल्हाध्यक्ष युवराज बाबर , ग्रामीण विभागाचे अध्यक्ष संजय जोगी , जळगाव जिल्हाध्यक्ष साहेबराव जोगी , विजय शिंदे, अण्णाभाऊ माळवे , युवा अध्यक्ष कैलास बाबर , संघटक नरेंद्र बाबर , यांनी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार चक्रधर मेश्राम यांना जाहीर पाठिंबा देऊन शेतकरी ऊस या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमतांनी निवडुन देण्यासाठी समस्त समाजबांधवांना आणि मतदारांना आवाहन केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment