भद्रावती जावेद शेख :-मिळालेल्या एका गुप्त माहितीच्या आधारे भद्रावती पोलीसांनी नाकेबंदी करुन दोन दुचाक्यांवरुन वाहुन नेत असलेला सुगंधित तंबाखू पकडला.
Fragrant tobacco caught at Dhorvasa.
याप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई तालुक्यातील ढोरवासा टि पॉईंटवर भद्रावती पोलिसांतर्फे दिनांक १४ला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. अमीत विठ्ठल बोंडे,वय ३१ वर्ष,राहणार, किल्ला वॉर्ड व वैभव महादेव लांडे,वय ३०वर्ष,सुमठाणा, भद्रावती अशी आरोपींची नावे असुन त्यांच्या जवळुन दोन दुचाक्या व सुगंधित तंबाखूचे ३६ डबे असा एकुण १लक्ष ८४हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment