मूल : जगन येलके यांची पोंभुर्णा तालुका गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली असून त्यांचा गोंडवाना गणतंत्र पार्टीशी कोणताही संबंध नाही, त्यामूळे जगन येलके यांनी भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर केलेला गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या पाठींब्यावर विश्वास ठेवू नये. असे आवाहन गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापुजी मडावी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकामधून केले आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकामधून जिल्हाध्यक्ष बापुजी मडावी यांनी जिल्हयातील सर्व तालुका अध्यक्ष नियुक्त करणे आणि पदावरून कमी करण्याचे सर्वाधिकार जिल्हाध्यक्ष यांना आहे. पोंभुर्णा येथील गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जगन येलके यांनी निवडणुकीच्या काही महिण्यांपूर्वी समाजाला विश्वासात न घेता काही बाबी समाज विरोधी केल्या. त्यामूळे समाजातील शेकडो बंधु भगिनींना नाहक त्रास सहन करावा लागला. या घटनेची दखल घेवून गोंडवाना गणतंत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. तुलेश्वरजी मरकाम आणि प्रदेशाध्यक्ष हरीशजी उईके यांच्या सहमतीने जिल्हाध्यक्ष या अधिकारान्वये जगन येलके यांची गोंडवाना गणतंञ पार्टीच्या पोंभुर्णा तालुकाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली. असे असतांना होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जगन येलके यांनी भोळया आदिवासी समाजाला विश्वासात न घेता भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचेशी संधान साधून सभेचे आयोजन केले. पार पडलेल्या सभेत गोंडवाना गणतंत्र पार्टीशी कोणताही संबंध नसतांना जगन येलके यांनी गोंडवाना गणतंत्र पार्टीचा सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठींबा जाहीर केला. मुनगंटीवार यांना पाठींबा जाहीर केल्याच्या बातम्या काही वृत्तपत्रामधून प्रकाशीत होताच पार्टीच्या पदाधिका-यांना आश्चर्य वाटले. ज्या व्यक्तीचा पार्टीशी कोणताही संबंध नाही त्याने पार्टीचा पाठींबा जाहीर कसा काय केला ? या प्रश्नावर चर्चा झाल्यानंतर असे ठरविण्यांत आले की, जगन येलके यांनी जाहीर केलेल्या पाठींब्यावर आदिवासी समाजातील बंधु-भगिनी आणि युवा मित्रांनी विश्वास न ठेवता व त्याचेशी कोणताही संपर्क न करता गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे.असे आवाहन जिल्हाध्यक्ष बापुजी मडावी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकामधून केले आहे.
0 comments:
Post a Comment