Ads

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल ला बोर्डाने डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे अपक्ष उमेदवार यांना दिला पाठिंबा

चंद्रपुर :- 72 बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामधून डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांना केवळ विधानसभेतील किंवा जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष आणि विविध सामाजिक घटकांचा पाठिंबा मिळत नसून राष्ट्रीय स्तरावरील मुस्लिम समाजाच्या सर्वोच्च पैकी एक असलेल्या ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल ला बोर्ड यांनी सुद्धा पाठिंबा जाहीर केलेला आहे
All India Muslim Personal Law Board supports Dr. Abhilasha Tai Gavture as an independent candidate
आज आरएसएस आणि भाजपाच्या माध्यमातून देशामध्ये प्रतिगामी शक्तींनी हाहाकार माजवलेला आहे आणि रंगांचे शोषण करणारी व्यवस्था येथे पुनर स्थापित झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये भाजपाला हरवू शकेल अशा सशक्त उमेदवारांना समर्थन देऊन आपली मते त्यांना देण्यासाठी मुस्लिम समाजाला प्रवृत्त करण्याची मोहीम मौलाना सज्जाद नोमानी साहेब यांनी चालविलेली आहे आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल ला बोर्ड आणि मुस्लिम समाजाने राज्यस्तरावर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे त्यांना असं वाटते की जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार भाजपला हरवू शकत नाही तिथे त्यांनी दुसऱ्या सशक्त उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामध्ये एक 72 बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून उभे असलेल्या लोकप्रिय समाजसेविका डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांना निवडणुकीसाठी पाठिंबा दिलेला आहे डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांचे केवळ विधानसभा आणि जिल्ह्यामध्येच काम नाही, तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर देखील त्यांनी बऱ्याच मंचावर काम केलेले आहे आणि त्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये त्यांनी केलेली कामे आणि त्यांनी दिलेले योगदान सुद्धा अतुलनीय आहे त्यांचं सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान हे जिल्ह्यामध्ये कुठेही तुलना करण्या सारखं नाही आणि ते करत असताना त्यांनी कुठलेही जात पात धर्म लिंग पंथ प्रांत भाषा यांचा भेद न करता योगदान दिलेला आहे आणि म्हणून अशा कार्याची दखल घेत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनला बोर्डचे देशांमध्ये प्रसिद्ध असलेले खलीलूलरहमान मौलाना सज्जाद नोमानी साहेब यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्यांनी समाज सर्व समाजाचे नेतृत्व विधानसभेमध्ये करावे अशी अभिलाषा व्यक्त केली आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment