वरोरा – वरोरा-भद्रावती विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार मुकेश जिवतोडे यांना आदिवासी सगा समाज संघटनेचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. या पाठिंब्यामुळे निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आदिवासी सगा समाज संघटनेने वरोऱ्यात आयोजित केलेल्या सभेत हा निर्णय घेतला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुकेश जिवतोडेंच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा दिला असून बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती तसेच सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या कामांची संघटनेने प्रशंसा केली.
संघटनेने त्यांच्या प्रमुख मागण्यांसह जिवतोडेंना पाठिंबा दर्शवला. यात आदिवासी समाजाच्या समस्या सोडवणे, बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, आणि पेणठाणा जागेचा प्रश्न मार्गी लावणे यांचा समावेश आहे.
मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वामुळे त्यांना विविध समाजघटकांकडून पाठिंबा मिळत असून, या पाठिंब्यामुळे निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
0 comments:
Post a Comment