Ads

आपलं पाप लपवण्यासाठी काँग्रेसचा खोटा डाव

चंद्रपूर :- राजवटीत गरीब आणखी गरीब होत गेला आणि नेते धनवान होत गेले. डीबीटीसारख्या योजना आणल्या असत्या तर ही वरकमाई बंद झाली असती. पण आपलं पाप लपविण्यासाठी काँग्रेस खोटा डाव खेळत आहे, अशी टीका राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. संविधान बदलेल अशी भीती काँग्रेस दाखवत आहे. पण संविधानाची पायमल्ली करीत काँग्रेसनेच आणीबाणी Emergency by Congress itself लागू केली होती, याचाही मुनगंटीवारांनी आवर्जून उल्लेख केला.
A false plan of Congress to hide its sin
एका मुलाखतीत ते बोलत होते. इंदिरा गांधी यांच्या काळापासून बेरोजगारीचा प्रश्न आहे. तेव्हापासून हा प्रश्न काँग्रेसने चिघळत ठेवला. मात्र महाराष्ट्रात बेरोजगारीच्या मुद्द्यावर महायुतीचं सरकार व्यापकपणे काम करीत आहे. मोठे उद्योग महाराष्ट्रात येत आहेत. काँग्रेसच्या राजवटीत विदर्भाचा विकास झाला नाही. पण आता चंद्रपूरसह विदर्भातील खेड्यापाड्यांपर्यंत विकास पोहोचला आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले.

काँग्रेसकडून भ्रष्टाचाराला खतपाणी
काँग्रेसने भ्रष्टाचाराला खतपाणीच घातले. मात्र नरेंद्र मोदी यांचे सरकार येताच डीबीटी योजना सुरू झाली. आता कोणत्याही अधिकाऱ्याच्या हातात रोख रक्कम येत नाही. प्रत्येक योजनेचे पैसे थेट लाभार्थी व्यक्तीच्या खात्यात जातात, याचाही त्यांनी उल्लेख केला.

*गरिबी नव्हे गरीब हटले*
काँग्रेसने सामान्यांचा पैसा लुटला. एवढा की कुबेराचा खजिनाही त्याच्यापुढे छोटा दिसेल. काँग्रेसने फक्त गरीबी हटाओचा नारा दिला. गरिबी तर हटली नाही, मात्र गरीब हटले. अगदी नेहरूपासून तर आता राहुल गांधी यांच्यापर्यंत हाच नारा सुरू आहे. खरंच गरीबांचे दु:ख दूर करण्यासाठी इतके वर्ष लागतात का, असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment