चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पोलीस अभिलेखावरील कुख्यात चोर, थोकादायक व्यक्ती अमोल आदेश ईलमकर यास एमपीडीए कायदा अंतर्गत पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी कारवाई केले आहे.
Action under MPDA Act against notorious thief on police record
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस सक्रिय झाले असुन मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, रिना जनबंधू अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई ची धडक मोहीम हाती घेतली आहे.
आगामी विधानसभा निवडणुक २०२४ च्या तोंडावर जिल्हयात शातंता अबाधित राखण्याकरीता चंद्रपूर जिल्हयातील पोलीस अभिलेखावरील धोकादायक व्यक्ती, कुख्यात चोर, दुखापत करणारा अमोल आदेश ईलमकर (२३) रा. समतानगर वार्ड क. ६ दुर्गापुर ता.जि. चंद्रपूर यांचेवर पो.स्टे. दुर्गापुर, रामनगर, बल्लारशाह, घुग्गुस येथे चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, अश्लिल शब्दात शिवीगाळ, दुखापत
आणि शस्त्र अधिनियम अंतर्गत एकुण २० गुन्हे दाखल असुन त्याची परीसरामध्ये दहशत आहे. त्याने सामान्य जनतेत दहशत निर्माण केली असुन त्याने गुन्हेगारी कारवाया चालुच ठेवल्याने त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून सुध्दा आरोपी कायदयाला जुमानत नसल्याने याची दखल पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी घेवुन सदर इसमावर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती दृकश्राव्य कलाकृती विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीयो पारेट्स) बाळु तस्कर अत्यावश्यक वस्तुचा काळा बाजार करणारी व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याविषयीचा अधिनियम सन १९८१ (सुधारणा २००९, २०१५) अन्वये प्रस्ताव तयार करून विनय गौडा जी.सी. भा.प्र.से.,
जिल्हादंडाधिकारी चंद्रपूर यांचेकडे सादर केला असता, त्यांनी सदर प्रस्तावाची दखल घेवुन प्रस्तावित इसम अमोल आदेश ईलमकर (२३) रा. समतानगर वार्ड क. ६ दुर्गापुर ता. जि. चंद्रपूर यास नमुद कायदयांतर्गत १ वर्षा करीता स्थानबध्द करण्याबाबत ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी आदेश
पारीत करण्यात आले होते. परंतु सदर हद्दपार इसम हा मिळुन न आल्याने सदर इसमाचा शोध घेवून त्यास ०५ नोव्हेंबर २०२४ रोजी ताब्यात घेवून त्यास मध्यवर्ती कारागृह चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे. आता पर्यंत सन २०२४ मध्ये पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी ३ कुख्यात गुन्हेगारांवर एमपीडीए कायदया अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रिना जनबंधू अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात सुधाकर यादव उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर, नयोमी साटम, सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा, महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक, स्थायुशा चंद्रपूर तसेच आसिफराजा बी. शेख ठाणेदार पो.स्टे. रामनगर यांनी मोलाची कारवाई केली आहे.
0 comments:
Post a Comment