Ads

ओ.एफ. चांदा परिसरात धुमाकुळ घालणारा बिबट जेरबंद

भद्रावती जावेद शेख :-दिनांक 19/11/2024 रोजी सकाळी 5.30 वाजता भद्रावती वनपरिक्षेत्रातील भद्रावती नियतक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या ओ.एफ. चांदा परिसरात धुमाकुळ घातलेल्या मानवी जिवीतास धोकादायक ठरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभाग यशस्वी झाले.
Leopard causing havoc in O.F. Chanda area captured
घटनेची सविस्तर हकीकत या प्रमाणे आहे मागील 1 महिन्यापासुन ओ.एफ. चांदा परिसरात बिबट धुमाकुळ घालुन मानवावर हल्ले करीत होता. हल्ल्यामध्ये दिनांक 14/10/2024 रोजी कु. सानिया नितेश राखडे रा. ओ. एफ. चांदा भद्रावती, हिला जखमी केले होते. त्यामुळे तेथील जनतेचा वनविभागावर प्रचंड रोष होता व बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी होती. यावर आळा घालण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरु होते. वरिष्ठ कार्यालयाकडुन बिबट्याला जेरबंद करण्याची परवानगी देण्यात आली. त्याकरीता बिबट्याला जेरबंद करण्यासाठी 2 पिंजरे, कॅमेरा ट्रॅप तसेच मा. श्री. प्रशांत खाडे, विभागीय वन अधिकारी चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री के. डब्ल्यु, धानकुटे वनपरिक्षेत्र अधिकारी भद्रावती यांचे नेतृत्वात भद्रावती क्षेत्रातील श्री. व्हि. व्हि. शिंदे, क्षेत्र सहाय्यक भद्रावती, श्री. डी. एम. गेडाम, बिट वनरक्षक क्षेत्रीय वनकर्मचारी, वनमजुर, PRT टिम दरोराज गस्त करत होते. बिबट पिंज-याजवळ येत होता परंतु पिंज- यात शिरत नव्हता. दि. 19/11/2024 रोजी बिबट्या पिंज-यात पंडल्याचे श्री. डी. एम. गेडाम यांनी सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास माहिती दिली असता घटनास्थळी जाऊन बिबट्‌याला ताब्यात घेण्यात आले.

सदर बिबट्याला ट्रांझीट ट्रिटमेंट सेंटर, चंद्रपूर येथे सुरक्षीत ठेण्यात आले. सदर मोहीम मा. प्रशांत खाडे, विभागीय वन अधिकारी चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनात मा. किरण वा. धानकुटे वनपरिक्षेत्र अधिकारी भद्रावती डॉ. एस. आर. रोडे पशुधनविकास अधिकारी भद्रावती, व्ही. व्ही शिंदे क्षेत्र सहाय्यक भद्रावती, डी. एम. गेडाम वनरक्षक भद्रावती, महादेव मडावी, किशोर मडावी, पवन मांढरे, अनिल शेंद्रे, अमर किन्नाके, कैलास डोंगे, राजु वालदे, वनमजुर सार्ड संस्था प्रतिनिधी अनुप येरणे, दिपक निबाळकर, शितील म्हैसकर व स्थानीक PRT टिम यांनी मोहीम यशस्वी केली. तसेच मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याच्या दृष्टीने यापुढेही शोधमोहीम सुरू राहील.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment