सादिक थैम वरोरा: पोलीसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे शेतात लपवून ठेवलेल्या दारूची विक्री करणाऱ्या इसमास 31 ऑक्टोबरला ताब्यात घेतले. यावेळी आरोपीकडून १ लाख 56 हजार रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. तालुक्यातील नागरी येथे येथील प्रशांत योगराज झाडे वय 39 यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वरोरा तालुक्यातील मुरदगाव येथील बोंडे नामक व्यक्तीची शेती प्रशांत झाडे हे ठेक्याने करत आहेत. या शेतातील गोठ्यात देशी दारूची साठवणूक करून ते ती विक्री करत असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली
या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुरदगाव येथील या शेतात धाड टाकली असता गोठ्यात असलेल्या मोपेड गाडीच्या पायदाणावर देशी दारूच्या चार पेट्या आढळून आल्या. त्या पोलिसांनी जप्त केल्या. आरोपी प्रशांत योगराज झाडे यांच्या शेतातील गोठ्याची तपासणी केली, तेव्हा त्यांना दारूच्या आणखी 35 पेट्या आढळून आल्या.
पोलिसांनी एकूण जप्त केलेल्या एकूण 39 दारूच्या पेट्यांची किंमत १ लाख ५६ हजार रुपये असून वाहन याची किंमत एक लाख वीस हजार असा एकूण दोन लाख 76 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी आरोपी विरोधात दारूबंदी कलमान्वये गुन्हा नोंदविला असून गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेक्शन शाखा करीत आहे.
ही कारवाई वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मेश्राम, उपनिरीक्षक दीपक ठाकरे,महेश गावतुरे, विशाल राजूरकर,मनोज ठाकरे यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment