घाटंजी तालुका प्रतिनिधी:-
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळीच्या पाडव्याला महेश पवार आणि मित्र मंडळ तर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन २ नोव्हेंबर रोजी घाटंजी शहरात करण्यात आलेले आहे. हे आयोजनाचे तिसरे वर्ष असून घाटंजीकरांचा उत्स्पूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभतो.
Saregama fame Akanksha Nagarkar will come to Ghatanji for 'Diwali Pahat'
या कार्यक्रमाला महाराष्ट्र संगीत रत्न विजेत्या सारेगामा फेम आकांक्षा नगरकर यांच्या मराठी बहारदार गीतांचा कार्यक्रम प्रस्तुत होणार आहे. हा कार्यक्रम पहाटे ५.३० वाजता रसिकाश्रय इथे सुरू होणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला सहकुटुंब आवर्जून उपस्थित रहावे आणि दिवाळीच्या सुमधुर गीतांचा आपल्या परिवारासहित आनंद घ्यावा असे आवाहन महेश पवार मित्र मंडळातर्फे करण्यात आलेले आहे.
0 comments:
Post a Comment