राजुरा :-राजुरा वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या टेंभुरवाही वनपरिक्षेत्रात तारेने हरणाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
One accused arrested in deer hunting case
टेंभुरवाही उपवन परिक्षेत्रातील खंबाळा निश्चित वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १७८ मध्ये वायरच्या सापळ्याच्या साहाय्याने हरणाची शिकार करण्यात येत असल्याची माहिती मिळताच क्षेत्र सहाय्यक प्रकाश मत्ते व वन कर्मचाऱ्यांनी तेथे पोहोचून पिंटू सिडाम यांना मृत हरणासह अटक केली. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत शिकारीसाठी वापरलेले साहित्य विविध कलमांतर्गत नोंदविण्यात आले आहे. ही कारवाई उपविभागीय वनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपविभागीय वन अधिकारी पवनकुमार जोंग यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक प्रकाश मत्ते, वनरक्षक पवन देशमुख, भोजराज दांडेकर, विजय ताकसांडे, व वनमजुर संजय चितलवार आदींनी केली आहे. वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश येळकेवाड यांच्या नेतृत्वात. पुढील तपास सुरू केला आहे.
0 comments:
Post a Comment