Ads

हिंदू समाजावरील हल्ल्यांविरोधात एकजूट होऊन मानवतेच्या रक्षणाचा निर्धार करा–आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुर :-हिंदू समाजावर सातत्याने होणाऱ्या अन्याय, अत्याचार आणि हिंसाचाराच्या घटना केवळ हिंदू समाजाचाच नव्हे तर मानवतेचा अपमान आहेत. हिंदू धर्म हा सहिष्णुता, शांती आणि सह-अस्तित्वाच्या मूल्यांचा प्रचार करणारा धर्म आहे. परंतु, बांगलादेशातील काही विघातक शक्ती या मूल्यांना पायदळी तुडवत आहेत. मंदिरे उद्ध्वस्त केली जात आहेत, निष्पाप नागरिकांवर हल्ले केले जात असून त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. हे सर्व मानवी हक्कांच्या आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांच्या पूर्णतः विरोधात असून, हिंदू समाजावरील हल्ल्यांविरोधात एकजूट होऊन मानवतेच्या रक्षणाचा निर्धार करा, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.
Unite against attacks on Hindu society and resolve to protect humanity – MLA KishorJorgewar
बांगलादेश येथे हिंदू समाजातील नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात आज चंद्रपूरात सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढण्यात आली होती. यात भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सहभाग नोंदवत बांगलादेशातील घटनेचा निषेध केला. दुपारी तीन वाजता शहरातील गांधी चौक येथून या न्याय यात्रेला सुरुवात झाली. सदर यात्रा घोषणा देत शहराच्या मुख्य मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आम्ही इथे एकत्र येऊन या घटनांचा तीव्र शब्दांत निषेध करत आहोत. बांगलादेश सरकारने त्वरित पावले उचलून या घटनांना आळा घालावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. तसेच या देशातील हिंदू बांधवांना सुरक्षा आणि सन्मानाने जगण्यासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून दिले जावे," असे ते यावेळी म्हणाले.

न्याय यात्रेत सहभागी हिंदू समाज बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

गांधी चौकातून निघालेल्या बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत सहभागी हिंदू समाज बांधवांसाठी भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने गांधी चौक येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतः येथे उपस्थित राहून हिंदू बांधवांना पिण्याचे पाणी वितरित केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment