जावेद शेख भद्रावती:-
भद्रावती तालुक्यातील मांगली येथील विवेकानंद हायस्कूल समोरून कुमरे यांच्या शेताकडे जाणारा पांदण रस्ता अर्धवट तयार करण्यात आला आहे.
Complete the partial Pandan Road at Mangli.
उर्वरित पांदण रस्ता हा ठिकठिकाणी खड्डे पडून अत्यंत खराब झाला असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून तो शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा यासाठी मांगली येथील शेतकऱ्यांतर्फे तहसीलदारांना एक निवेदन सादर करण्यात आले आहे. सदर रस्ता अर्धवट तयार करण्यात आला असून उर्वरित रस्त्यावर रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर मुळे मोठेमोठे खड्डे पडलेले आहे. पावसाळ्यात हा रस्ता दळणवळणाच्या उपयोगाचा राहत नसल्याने शेतकऱ्यांना शेतात बी बियाणे, वाहने, शेतीपयोगी साधने नेण्यास अडचण निर्माण होत असते. त्यामुळे त्यांना शेती करणे कठीण झाले आहे. ही समस्या लक्षात घेऊन उर्वरित रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करून पूर्ण करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना आयाना मोहिद शेख, मुजाहिद शेख, धनु निवलकर, कामटकर, सुनील पतरंगे आदी शेतकरी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment