Ads

शहीद अक्षय निकुरेला शोकाकुल वातावरणात अंतिम निरोप

सादिक थैम वरोरा: जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात डिसेंबर रोज मंगळवारला मराठा 11 बटालियन Maratha 11 Battalion मध्ये कार्यरत जवानांचे वाहन खोल दरीत कोसळले होते. या अपघातात शहीद झालेल्या पाच जवानांमध्ये वरोरा तालुक्यातील पिंपळगाव( मारोती) येथील अक्षय दिगंबर निकुरे याचा समावेश होता होता.
Martyr Akshay Nikure bids final farewell in a mournful atmosphere
शहीद झालेल्या अक्षयचे पार्थिवावर आज 26 डिसेंबर रोज गुरुवारला त्याच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.
आज शहीद अक्षयचे पार्थिव घेऊन कामठी आर्मी सेंटरची चमू साडेअकराच्या सुमारास त्याच्या मूळ गावी पोचल्यानंतर गावाच्या वेशीवर आमदार करण देवतळे यांनी त्याच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून सर्वप्रथम आपली श्रद्धांजली शहीद हुतात्म्यास अर्पण केली. यानंतर अमर रहे, अमर रहे,अक्षय निकुरे अमर रहे. भारत माता की जय, वंदे मातरम अशा प्रकारच्या घोषणा देत निघालेली त्याच्या पार्थिवाची मिरवणूक त्याचे राहते घरी पोहचली.
या मिरवणुकीत परिसरातील स्त्री-पुरुष जनसागराच्या स्वरूपात लोटला होता.पार्थिव घरी पोहोचताच उपस्थित नातलग आई-वडील व नातलगाने आपल्या आसूंना वाट मोकळी करून दिली. यानंतर त्याच्या राहत्या घरून त्याची अंतिम यात्रा पिंपळगाव (मारोती) या गाव मूळ गावी असलेल्या स्मशानभूमीत पोहचली. अंतिम यात्रेच्या मार्गात ठिकठिकाणी तिरंगी ध्वज व शहीद अक्षय बाबत आपल्या शोकसंवेदना व्यक्त करणारे फलक लावण्यात आले होते. मार्गातील घरांसमोर भारतीय जवानांबाबत संवेदना व्यक्त करणाऱ्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
ही अंतिम यात्रा स्मशानभूमीत पोचल्यानंतर त्याचे शव एका सजवलेल्या टेबलवर ठेवण्यात आले. यानंतर सर्वप्रथम शासनातर्फे येथील तहसीलदार योगेश कौटकर यांनी तर यानंतर उपजिल्हाधिकारी शुभम दांडेकर,सहाय्यक पोलीस अधीक्षक व येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम, संवर्ग विकास अधिकारी गजानन फुंडकर,शहीद अक्षयचे धाकटे बंधू निलेश व आई वडील, पिंपळगावच्या सरपंच सुचिता ठाकरे, पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे,पोलीस पाटील शोभाताई चंदनबटवे, मराठा बटालियनचे सुभेदार भोयर, हवालदार महेश सपकाळे, माजी सुभेदार प्रभाकर सावंत, हवालदार निबाटकर,वरोरा माजी सैनिक संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश बोभाटे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे व सर्वात शेवटी 11 मराठा बटालियनचे कर्नल गुरुचरणसिंग बैस यांनी पुष्पचक्र वाहून आपली आदरांजली वाहिली.
यानंतर कामठी येथील आर्मी ट्रेनिंग सेंटर च्या जवानांनी बंदुकीतून २१ फायर करून त्याला सलामी दिल्यानंतर अक्षयच्या पार्थिवाला त्याचा लहान भाऊ निलेश याने भडाग्नी दिला. यावेळी उपस्थित जनसागर शोकाकुल झाला होता.
यानंतर गुरुचरणसिंग बैस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत जिल्हा शिवसेनाप्रमुख मुकेश जीवतोडे शहीद योगेश डाहुलेचे वडील वसंतराव डाहूले,सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे, माजी सैनिक दिगंबर खापने, यवतमाळचे राजू महाडिक, पिंपळगावच्या सरपंच यांनी आपल्या संबोधनातून अक्षय शहीद अक्षयला श्रद्धांजली वाहिली. यावेळी परिसरातील गावातून नागरिक, शासकीय अधिकारी, पत्रकार व गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या.
वरोरा तालुक्यातील पिंपळगाव (मारोती)या छोट्याशा गावातील अक्षय निकुरे व त्याचा भाऊ निलेश हे दोघे भारतीय सेनेत सेवा बजावत होते. हे दोघेही जम्मू काश्मीरमध्ये मराठा 11 बटालियनमध्ये कार्यरत होते.
मंगळवार 24 डिसेंबरला जवानांचे वाहन पुंछ जिल्ह्यातील बनोईकडे जात असताना लष्कराचे हे वाहन दरीत कोसळले. या वाहनात असलेल्या 18 जवानांपैकी पाच जवान शहीद झाले होते. या वाहनाच्या मागे असलेल्या दुसऱ्या वाहनात निलेशही होता.
या अपघातात अक्षय निकुरे शहीद झाल्याची वार्ता रजेवर असलेल्या वर्धा येथील त्याच्या मित्र जवानाने कुटुंबाला दिली ही वार्ता कुटुंबाला कळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
अक्षय निकुरे यांनी टेमूर्डा येथील संत तुकडोजी महाविद्यालयात बारावीपर्यंत तर महाविद्यालयीन शिक्षण वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालयात घेतले. शिक्षण घेत असताना सैन्यात दाखल होणार व्हायची त्याची इच्छा होती. त्यामुळे बीए च्या अंतिम वर्षात शिकत असतानाच 21 व्या वर्षी 2018 मध्ये तो भारतीय सैन्य दलात दाखल झाला.यानंतर 2019 मध्ये त्याचा भाऊ निलेश हा देखील सैन्य दलात रुजू झाला. हे दोघेही 11 मराठा बटालियन मध्ये कार्यरत होते हे विशेष.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment