जावेद शेख भद्रावती:-सन1971 मधे पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावून या युद्धात भारताला विजय संपादन करून देणाऱ्या सेवानिवृत्त "विजयंता" या रणगाड्याची The tank "Vijayanta" भद्रावती येथील आयुध निर्माणी चांदाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्थापना करून त्याचे उद्घाटन करण्यात आले.
Installation of the Vijayanta tank near the entrance to the Ordnance Factory.
यावेळी पार पडलेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मावळते मुख्य महाप्रबंधक विजयकुमार, अनिता कुमारी, नवे मुख्य महाप्रबंधक प्रवीणकुमार पांडे, महाप्रबंधक एस. एम. सुपे, पी. एन. पारधी, आनंद सिंग, उरकुडे, गौरव मालवीय, सर्व कामगार संघटनेचे नेते तथा कर्मचारी उपस्थित होते. सदर विजयंता रणगाड्याने सण 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात महत्त्वाची कामगिरी करून भारताला विजय मिळवून दिला होता. सेवानिवृत्तीनंतर सदर रणगाडा पुणे येथील आयुध निर्माणितील डेपोत ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्याला भद्रावती येथे आणून त्याची स्थापना करण्यात आली. हा विजयंता रणगाडा नेहमी युद्धातील विजयाचा साक्षी राहून तो नव्या पिढीला प्रेरणा देत राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
0 comments:
Post a Comment