जावेद शेख भद्रावती :-आयुध निर्माणी येथील कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अगदी किफायतशीर किमतीत विविध वस्तू उपलब्ध करून देणाऱ्या आयुध निर्माणी वसाहतीतील हेमा मुजुमदार सभागृहा जवळील निर्माणीच्या युनिट कॅन्टीनच्या नव्या इमारतीचे उद्घाटन निर्माणीचे महाप्रबंधक विजयकुमार यांच्या हस्ते पार पडले.
Inauguration of the new building of the new unit canteen in the Ordnance Factory Colony.
यावेळी अनिता कुमारी, नवे मुख्य महाप्रबंधक प्रवीण कुमार पांडे, महाप्रबंधक एस. एम. सुपे, पी. एन. पारधी, उरकुडे, गौरव मालवीय, आनंद सिंग, सर्व कामगार संघटनेचे नेते तथा कर्मचारी उपस्थित होते.सदर नवी इमारत आजपासून नागरिकांच्या सेवेत रुजू झाली आहे.सदर युनिट कॅन्टीनची जुनी इमारत ही जीर्ण झाली होती, त्याबरोबरच ती अपुरी पडत होती. त्यामुळे सदर नव्या इमारतीची निर्मिती करण्यात आली आहे.
0 comments:
Post a Comment