(प्रशांत गेडाम)नागभीड- ब्रह्मपुरी वनविभागाच्या नागभीड वन परिक्षेत्रांतर्गत असलेल्या मांडला परिसरातील पूर्ण वाढ झालेल्या भारतीय गौरचा(रानगवा) Gaurआज सकाळी ९.०० वाजता कालव्यात पडून मृत्यु.
सकाळी शेतीच्या कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना एक भारतीय गौर कालव्यात पडून तरंगताना दिसले, त्यांनी तत्काळ स्वॅब संस्थेला याची माहिती वनविभागाला देण्यात आली, त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी व स्वॅब संस्थेच्या सदस्यांनी या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचले. मात्र जोपर्यंत वनविभाग आणि स्वॅब संस्थेचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले, तोपर्यंत या भारतीय गौरचा बुडून मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोहोचल्यानंतर वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करून लोकांच्या मदतीने व दोरीच्या साहाय्याने दीड टन वजनाच्या व अंदाजे 11 ते 13 वर्षे वयाच्या भारतीय गौरला कालव्यातून बाहेर काढले. दोरीचा साह्याने पाण्यातून बाहेर काढल्यानंतर मृत भारतीय गौरच्या शरीरावर वाघाच्या पंजाच्या दातांच्या खुणा होत्या. यावरून वाघाने पाठलाग करून हल्ला केल्याने हा रानगवा धावत असताना कालव्यात पडला व रात्रभर कालव्यात राहिल्याने सकाळी थकवा आल्याने 10 ते 12 च्या सुमारास त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे समजते.
त्यानंतर घटनास्थळीच मृतदेहाचे विच्छेदन नागभीडच्या पशुधन विकास अधिकारी कु. ममता वानखेडे यांनी शवविच्छेदन केले. आणि त्याला जेसीबीने जागीच गाळले.
सध्या वनविभागाचे नागभीडचे वन परिक्षेत्र अधिकारी (अतिरिक्त प्रभार) अरूप कन्नमवार, मिंडाळ्याचे क्षेत्र सहाय्यक तावडे, जनकपूरचे वन परिक्षेत्र वनरक्षक नवघडे, स्वाब संस्थेचे रेस्क्यू टीम प्रमुख जीवेश सायम, यश कायरकर, नितीन भेंडारे, डॉ. गणेश गुरनुले, अमन करकडे, शुभम निकेशर, डब्ल्यूपीएसआयचे रोशन धोत्रे, वन मजूर उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment