सादिक थैम वरोरा: महायुतीच्या सरकारमध्ये जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना स्थान द्या या मागणीसाठी चंद्रपूरहून निघालेल्या कार्यकर्त्यांचे वरोरा नगरीत स्वागत करण्यात आले व या कार्यकर्त्यांना नागरिकांनी आपले समर्थनही दिले.
पाय रक्तबंबाळ झाले तरी चालेल पण सुधीरभाऊंना मंत्रीपद मिळालेच पाहिजे यासाठी जिल्ह्यातील कार्यकर्ते एकवटले असून ते पायी नागपूरच्या दिशेने काल रवाना झाले. सुधीरभाऊ पालकमंत्री असताना विकासाची अनेक कामे केली आणि जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. अशा भाजपच्या आणि राज्यातील एका मोठ्या हेवीवेट नेत्याला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता नाराज होऊन पानावलेल्या डोळ्यांनी चंद्रपूर वरून दिल्ली गाठायची आणि सुधीरभाऊंना मंत्रीपद मिळायची मागणी पक्षश्रेष्ठी समोर ठेवायची, या विचारातून प्रेरित होऊन नागपूर मार्गे दिल्लीच्या दिशेने निघाले. काल रात्री खूप उशीर झाल्यामुळे वरोरा येथे रस्त्यात मुक्काम करण्यासाठी ते थांबले. त्यावेळी या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी व आपले समर्थन दर्शवण्यासाठी जागृती संघटनेचे अध्यक्ष तथा वरोरा जिल्हा झालाच पाहिजे या मागणीसाठी पुढाकार घेणारे प्रवीण धनवलकर यांनी सामाजिक कार्यकर्त्यासह या कार्यकर्त्यांची भेट घेत आपले समर्थन या मागणीला दर्शविले. या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन समोर निघत आहे.
यावेळी मुख्य कार्यकर्ते फारुक शेख, हरीश व्यवहारे, सुरज पारखी, अमित तांबटकर, अरविंद बोरकर, देवानंद थोरात भोजराज शिंदे,मनोज ठेंगणे, दीपक सिंग आदी कार्यकर्त्यांचा चंद्रपूर वरून निघालेल्या कार्यकर्त्यांमध्ये समावेश आहे.
0 comments:
Post a Comment