भद्रावती जावेद शेख :-आदर्श ग्राम पंचायत सागरा, तालुका भद्रावती येथील आदर्श सरपंच श्री शंकर न रासेकर व गावकऱ्यांनी दिनांक 16/12/2024 रोज सोमवार दुपारी 4 वाजता पासुन माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या आदेशा विरुध्द आमरण उपोषण सुरू केले आहे.
Adarsh Sarpanch and villagers of Adarsh Gram Panchayat Sagara go on a hunger strike against the orders of former minister Chhagan Bhujbal.
सागरा येथील सरपंच व गावक-यांनी दिनांक 10/04/2023 रोजी सागरा येथील रास्तभाव दुकानदार प्राधिकारपत्र धारक श्री मोतीराम सिताराम मारेकर यांची तक्रार केली होती सदर तक्रारीची दखल घेवुन मा तहसिलदार साहेब भद्रावती व निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक यांनी चौकशी केली असता प्राधिकारपत्र धारक दोषी आढळले त्यामुळे दिनांक 19/04/2023 ला सागरा येथील रास्त भाव दुकानदार श्री. मोतीराम सि मारेकर यांचे कडील रास्तभाव दुकान वाघेडा येथील रास्त भाव दुकानास संलग्न करण्यात आले होते त्यानुसार तपासणी वेळी शिल्लक असलेले अन्न धान्य जप्त करून सुपुर्त नामावर श्री आनंदराव दातारकर प्राधिकारपत्र धारक यांच्या ताब्यात देण्यात आले.
त्यामुळे सागरा येथील प्राधिकारपत्र धारक श्री. मोतीराम सि. मारेकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपुर यांच्या कडील अपील केली असता सुनावणी मध्ये दोषी आढळल्याने मा. जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपुर यांनी दिनांक 16/05/2023 रोजीच्या आदेशान्वये श्री मोतीराम सि मारेकर यांचे कडील प्राधिकारपत्र कायमस्वरूपी रद्द केले होते तसेच स्वस्त धान्य दुकानदार श्री. मोतीराम सि. मारेकर यांचे कडुन रू. एक लाख पंचेचाळीस हजार एकशे चौऱ्यांनव्व (रू. 1,45,194.00) वसुल करावे असा आदेश काढला होता
मा. जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपुर यांनी दिनांक 16/05/2023 रोजी केलेल्या आदेशा विरूध्द श्री. मोतीराम मारेकर यांनी पुर्ननिरीक्षण अर्ज मा. उपायुक्त (पुरवठा) नागपुर विभाग, नागपुर यांचे कडे दाखल केला सदर प्रकरणाची वारंवार सुनावणी घेतल्यानंतर मा. उपायुक्त (पुरवठा) नागपुर विभाग, नागपुर यांनी दिनांक 21/08/2023 रोजी आदेश पारीत करून अर्जदार श्री मोतीराम सि मारेकर यांनी दाखल केलेला पुर्ननिरीक्षण अर्ज नामंजूर केलेला होता व मा. जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपुर यांचा दिनांक 16/05/2023 रोजीचा आदेश कायम ठवेलेला होता.
परंतु प्राधिकारपत्र धारक श्री. मोतीराम सि. मारेकर यांनी मा. उपायुक्त (पुरवठा) नागपुर विभाग, नागपुर व मा जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपुर यांनी केलेल्या आदेशा विरूध्द माजी मंत्री छगन भुजबळ मंत्री अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे कडे पुर्ननिरीक्षण अर्ज दाखल केला त्यानुसार दिनांक 12/02/2024 रोजी सुनावणी घेण्यात आली, झालेल्या सुनावणी अन्वये मा. मंत्री छगन भुजबळ यांनी श्री. मोतीराम सि. मारेकर यांचा अर्ज अशतः मंजुर करून मा.उपायुक्त (पुरवठा) नागपुर विभाग, नागपुर व मा. जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपुर यांनी पारीत केलेला आदेश रद्द करून प्राधिकारपत्र धारक श्री. मोतीराम सि मारेकर यांचे स्वस्त धान्य दुकान पुर्ववत सुरू करण्याचे आदेश मा. जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपुर यांनी दिले
गैरव्यवहार करून माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेला आदेश अत्यंत अन्याय कारक असून शासकीय अधिकाऱ्यांनी कलेल्या कार्यवाही विरूध्द तसेच सागरा गावकऱ्यांच्या विरूध्द आहे त्यामुळे आदर्श ग्राम पंचायत सागरा येथील सरपंच श्री. शंकर न. रासेकर व गावकरी दिनांक 16/12/2024 रोज सोमवार दुपारी 4.00 वाजता पासुन आमरण उपोषणाला बसलेले आहेत. जोपर्यंत सदर आदेश रद्द होणार नाही व स्वस्त धान्य दुकानदार श्री. मोतिराम सि. मारेकर यांचे प्राधिकारपत्र कायमस्वरूपी रद्द होणार नाही तो पंर्यत आमरण उपोषण चालू राहील अशी भूमिका सरपंचासहीत गावकऱ्यांनी घेतलेली आहे.
0 comments:
Post a Comment