जावेद शेख भद्रावती : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत केलेल्या वक्तव्याचा शुक्रवार (दि.20रोजी भद्रावती शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निषेध करण्यात आला. काँग्रेसच्या पदाधिकारी सर्वपक्षीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात हे निषेध आंदोलन केले. यावेळी नारेबाजी करत अमित शाह यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.
Slogans raised against BJP Home Minister Amit Shah in Bhadravati
काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने व सर्वपक्षीय मिळून हे निषेध आंदोलन करण्यात आले. अमित शाह यांनी राजीनामा द्यावा आणि देशाची माफी मागावी असे म्हणत चौकात निषेधात्मक निदर्शने करण्यात आली.
यावेळी प्रवीण काकडे, सुरज गावंडे विनय बोधी डोंगरे, संध्याताई पोडे ,सरितासुर ज्योतीताई मोरे, ज्योती खाडे, संजू पॉडे, ईश्वर निखाडे, मिलिंद शेंडे, रीतेश वाढई ,,विजय भोयर,शंकर मून, कुशल मेश्राम, फैयाज शेख ,विशाल बोरकर ,अमित नगराले , रतन पेटकर,रामटेके यांच्यासह अनेक आंबेडकरीप्रेमी नागरिक उपस्थित होते,
0 comments:
Post a Comment