सादिक थैम :-वरोरा शहरातील बावणे लेआऊट व काॅलरी वॉर्डातील जवळपास 15 महिला रामपूर येथील एका शेतमालकाच्या शेतात ऊसतोडणी साठी गेल्या होत्या. काम आटोपल्यानंतर एम एच 34 डी 4515 या क्रमांकाच्या आटोने वरोरा कडे येत असताना त्याच मार्गाने एम एच 31ए एम 8313 क्रमांकाचे आर्टिका वाहनातून भंतेजी मूल येथे धम्म परिषदेला जात होते. आर्टिका कारने नागपूर चंद्रपूर महामार्गवरील येन्सा गावाजवळ वळणावर मजुरांच्या आटो वाहनाला जबर धडक दिली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून १३ महिला व दोन भंतेजी जखमी झाले आहेत.
जखमी महिलांपैकी 9 महिलांना चंद्रपूर सामान्य रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले असून 4 महिला आणि दोन भंतेजी यांचेवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
सदर घटना 26 जानेवारी रोजी रविवारला सायंकाळी 5 च्या सुमारास घडली.मृतक महिलांचे नाव रंजना चंद्रकांत झुंनझुनकर वय 46, सविता अरविंद बुरटकर वय 42,रा. बावणे ले आऊट वरोरा असे आहे.
जखमीमध्ये मंजुषा प्रकाश दडमल वय 31,अलका महादेव अंबाडे वय 49,सविता भास्कर झाडे वय 33,प्रेमीला बालाजी उईके वय 40,सुरेखा प्रफुल आत्राम, मंगला गोविंद गभणे वय 40 ह्या महिला गंभीर जखमी आहे.दोन्ही वाहनांच्या चालकांना वरोरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.
बिकट आर्थिक परिस्थिती असल्याने पोटाची खळगी भरणे कठीण होत असते. त्यामुळे मजुरी करण्याशिवाय पर्याय नसतो.वरोरा शहरातील बावणे ले आऊट व कॉलरी वॉर्डातील महिलांचा समूह खांबाड्याजवळील रामपूर येथे एका शेतमालकाचे शेतात ऊस तोडणी कामासाठी जात होतें. काम आटोपल्या नंतर परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर मजुरांच्या आटोला कार ची धडक यामध्ये दोन महिलांचा मृत्यू आणि इतर गंभीर जखमी झाले. त्यामुळे सदर महिलांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मृतक महिलांचे कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी कुटुंबानी मागणी केली आहे. यातच शहरातील सामाजिक कार्यकर्ते आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्नरत आहे.
0 comments:
Post a Comment