सादिक थैम वरोरा: स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांसह वरोरा हददीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना एका पांढऱ्या रंगाच्या स्विप्ट डिजायर गाडीत अवैध्यरित्या देशी दारु वाहतूक करुन विक्रीसाठी नेत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे 26 जानेवारी रोज रविवारला पोलिसांनी कारवाई करत तीन लाख 98 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
Local Crime Branch action against those transporting illegal liquor in vehicles
पोलिसांनी प्राप्त माहितीवरून वरोरा कडून नागपुर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील खांबाडा समोर असलेल्या खालसा धाब्यासमोर नाकाबंदी केली असता स्विफ्ट डिजायर गाडीचा चालक गाडी न थांबविता थोड्या समोर जाऊन रोडच्या कडेला लावून पळून गेला.
पोलिसांनी सदर वाहनाची पाहणी केली असता वाहनामधे देशी दारूच्या प्रत्येकी 90 ml 2800 नीपां(28 पेटी) किंमत 98,000 रूपयांचा तसेच स्विफ्ट डिजायर गाडी किंमत 3,00,000 रूपये असा एकूण 3,98,000 रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष कारवाई करून जप्त केला.
पोलिसांनी आरोपीविरुध्द वरोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार ,स्वामीदास चालेकर,धनराज करकाडे ,नितीन कुरेकार, दिपक डोंगरे, दिनेश अराडे,प्रशांत नागोसे , शशांक बदामवार,गोपीनाथ नरोटे यांनी केली.
0 comments:
Post a Comment